स्वारातीच्या अंबाजोगाईतील निवासी डॉक्टरने संपविली जीवनयात्रा
बीड, 08 एप्रिल (हिं.स.)। स्वामी तीर्थ येथील रामानंद ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (स्वाराती) एका तरुण निवासी डॉक्टरने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. डॉ. मंदार दाभाडे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून,
स्वारातीच्या अंबाजोगाईतील निवासी डॉक्टरने संपविली जीवनयात्रा


बीड, 08 एप्रिल (हिं.स.)। स्वामी तीर्थ येथील रामानंद ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (स्वाराती) एका तरुण निवासी डॉक्टरने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. डॉ. मंदार दाभाडे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, ते 'स्वाराती' रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेत होते.

अंबाजोगाईतील चनई परिसरातील रोहिदास नगर भागात एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. बराचवेळ झाला तरी त्यांच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. संशय आल्याने स्थानिक नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी तपासणी केली असता, गळफास लावून घेत जीवनयात्रा संपवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात पंचनामा केला. यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कामाचा अतिताण, वैयक्तिक नैराश्य की अन्य काही कारणे, या सर्व दिशांनी पोलिस सध्या तपास करत आहेत.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला मेसेज करून मोबाईलचा पासवर्ड सांगितल्याची माहिती आहे. पोलिस त्या दिशेनेही तपास करत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande