सोलापूर - सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत
सोलापूर, 08 एप्रिल, (हिं.स.)। सारथी युथ फाउंडेशन सोलापूर ही संस्था तंबाखू व्यसनमुक्ती साठी सतत धडपड असते. यासाठी शाळा, महाविद्यालये, वस्ती पातळीवर सत्रे घेणे, प्रदर्शने लावणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आदीचे आयोजन करून तंबा
Vff


सोलापूर, 08 एप्रिल, (हिं.स.)। सारथी युथ फाउंडेशन सोलापूर ही संस्था तंबाखू व्यसनमुक्ती साठी सतत धडपड असते. यासाठी शाळा, महाविद्यालये, वस्ती पातळीवर सत्रे घेणे, प्रदर्शने लावणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आदीचे आयोजन करून तंबाखू व्यसनमुक्तीचा प्रसार सुमारे पंधरा वर्षांपासून करत आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक कॅन्सर दिना पासून संस्थेने आपल्या कौशल्य विकास प्रशिक्षण ( ट्रेनिंग) सेंटर विनायक नगर येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी मौखिक तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

आतापर्यंत चार शिबिरे पूर्ण झाली. या शिबिरास डॉ. शिवकुमार वामने हे आपली सेवा देत आहेत. या शिबिरांचा विडी घरकुल वसाहतीतील रहिवाशांना फायदा होत आहे. संस्थेचे कार्य पूर्णपणे देणग्यावर अवलंबून असल्याने संस्थेने आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि औषधे यासाठी समाजातील दानशुरांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे यास प्रतिसाद मिळून ईनर व्हील क्लब सोलापूरच्या पदाधिकारी श्रीमती भारती पाटील, श्रीमती दीपा देसाई, आणि डॉक्टर चेतना मेनन यांनी या शिबिरास भेट घेऊन संस्थेच्या गरजेप्रमाणे अनेक वैद्यकीय उपकरणे आणि औषधे यांची मदत संस्थेला केली. या दोन्ही संस्था मिळून जर काम करू लागल्या तर याचा फायदा सोलापूरच्या रहिवाशांना नक्की होऊ शकेल असे मत इनरव्हील क्लबच्या प्रोजेक्ट पदाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande