
बीड, 08 एप्रिल, (हिं.स.)। म्हसोबाची वाडी येथील नारळी सप्ताहाची गुरुवारी सांगता होत असून, या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासह अनेक मंत्री व खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. यानुषंगाने सप्ताह कमिटीसह प्रशासनाकडून तयारीचे काम सुरू आहे.
संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभकेलेला पारंपरिक श्री गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह बीड अहिल्यानगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे येथे सुरू आहे. गुरुवार, ९ एप्रिल रोजी सकाळी सप्ताहाची सांगता होणार आहे
येथील नारळी सप्ताहास राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर येणार आहेत. तसेच बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास एक ते दीड लाख भाविक भक्त येणार असल्याने अंभोरा पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्याचे नियोजन सुरू आहे. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक असे ५० अधिकारी, २५० पोलिस कर्मचारी आणि काही स्वयंसेवक असा बंदोबस्त राहणार आहे.
सांगता सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री व खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. यादृष्टीने सप्ताह आयोजक व प्रशासनाकडून नियोजन आखण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis