सिल्लोडचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। सिल्लोड शहराचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरु झाला. शेंदूर-टोप मिरवणूक, धार्मिक विधी, तगदराव आणि बारागाडे ओढण्याचा थरार यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. यानिमित्ताने संपूर्ण शहर
सिल्लोडचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात


छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। सिल्लोड शहराचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरु झाला. शेंदूर-टोप मिरवणूक, धार्मिक विधी, तगदराव आणि बारागाडे ओढण्याचा थरार यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. यानिमित्ताने संपूर्ण शहरात भक्तीचे वातावरण असून, राज्यभरातून आलेल्या सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

यात्रेची सुरुवात पारंपरिक शेंदूर-टोप मिरवणुकीने झाली. मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वागत व श्रींचा महाअभिषेक करण्यात आला. स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळी डाळ्या-रेवड्यांची खरेदी करून आपली गौरवशाली परंपरा जपण्याचे आवाहन केले.

भाविकांनी नवस पूर्ण करण्यासाठी बारागाडे ओढले. मंदिर परिसरात नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. श्रद्धेचा भाग म्हणून दिवसभरात सुमारे २०० बोकड्यांचा बळी देऊन भाविकांनी नवस फेडले. मंदिर परिसरात रहाटपाळणे, प्रसाद व विविध दुकाने थाटण्यात आलेली आहे.

या सोहळ्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष सुदर्शन अग्रवाल, नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, प्रताप प्रसाद, नंदकिशोर सहारे, दत्ता शेजुळ, लखन ठाकूर, अशोक बन्सोड, सुधाकर पाटील, राजेंद्र बन्सोड, शंकरराव खांडवे यांसह मान्यवर उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande