
मनपाची विरोधानंतरही धडक कारवाई , नागरिकांकडून स्वागत
नाशिक, 08 एप्रिल (हिं.स.)
- पेठ रोडवरील अतिक्रमणामध्ये असलेले वादग्रस्त दुकानाचे अखेर महानगरपालिकेने बुधवारी सकाळी तोड काम करून दुकान उध्वस्त केले
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे या शहरातील अतिक्रमण धारकांना एक संधी देऊन अतिक्रमण काढण्याचे काम वेगाने सुरू आहे हे काम करत असताना त्यामध्ये पक्के बांधकामा देखील तोडण्यात येत आहेत .
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या पेठ रोड या ठिकाणी कैलास मठाच्या भिंतीला लागून पटेल नावाच्या व्यक्तीने काही वर्षांपासून किराणा दुकान सुरू केलेले होते हे दुकान अतिक्रमणामध्ये असल्याचे कैलास मठाच्या वतीने निदर्शनास आणून दिले होते त्यावरती नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने संबंधित दुकानदाराला दोन वेळा नोटीसा देखील देण्यात आलेल्या होत्या परंतु त्या नोटीसी कडे त्यांनी दुर्लक्ष केले महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने देखील संबंधित पटेल नामक दुकान मालकाला समज देखील देण्यात आलेली होती परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. कैलास मठ आणि त्याच्या शेजारी असलेल्या जागेच्या सामायिक भिंतीमध्ये संबंधित दुकानदाराने हे दुकान सुरू केलेले होते याबाबत कैलास मठातील अनेक गुरुजींनी याबाबत होणाऱ्या त्रासासाठी दुकानदारालाही समजून सांगितले होते परंतु त्यांनी त्यावेळी ऐकले नाही याबाबत नागरिकांच्या देखील मोठ्या प्रमाणावरती तक्रारी होत्या नागरिकांनी ही अतिक्रमण विभागाकडे याबाबत तक्रारी केलेल्या होत्या
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने या ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबविण्याच्या साठी पथक सायंकाळी दाखल झालेले होते परंतु यावेळी दुकान मालकाच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला अतिक्रमण पथकाला विरोध केला जवळपास मध्यरात्रीच्या सुमारास त्यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही अतिक्रमण मोहीम थांबविण्याबाबत सांगितले होते त्यानंतरही दुकानदाराला महानगरपालिकेच्या वतीने समजून सांगण्यात आले होते परंतु कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद संबंधित दुकानदाराने दिला नाही.
अखेर प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी सकाळी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित दुकानदाराला एक संधी देऊन त्याचे सर्व सामान काढून घेण्यास सांगितले आणि त्यानंतर या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता दुकानदाराने काहीसा विरोध केला परंतु तो विरोधी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धुडकवून लावला आणि कारवाई केली.
महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे पंचवटी विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी राहुल जाधव, निखील जाधव, खैरे, रवी जाधव ,चौधरी, यांच्या सह पंचवटी व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली
भाजपच्या माजी नगरसेवकाच्या भावाचे आणि एका विद्यमान नगरसेविकेच्या नातेवाईकांचे असलेले संबंधित दुकानदार असून या दुकानावर कारवाई होऊ नये म्हणून आतापर्यंत अभय मिळाले होते परंतु आता मात्र त्यावर कारवाई करण्यात आली त्यामुळे या भागातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV