पैठणमध्ये गॅससाठी महिलांचा एल्गार; एजन्सीला संतप्त ग्राहकांकडून घेराव
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल, (हिं.स.)। जागतिक स्तरावरील युद्धाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त झालेल्या शेकडो महिला आणि नागरिकांनी पैठणमधी
पैठणमध्ये गॅससाठी महिलांचा एल्गार; एजन्सीला संतप्त ग्राहकांकडून घेराव


छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल, (हिं.स.)। जागतिक स्तरावरील युद्धाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त झालेल्या शेकडो महिला आणि नागरिकांनी पैठणमधील एका गॅस एजन्सीवर धडक दिली. गॅस मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या ग्राहकांनी मालक आणि व्यवस्थापकांना घेराव घातल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील सुमारे २२ हजार ग्राहकांना सेवा देणाऱ्या 'संत एकनाथ गॅस सर्व्हिसेस' या एजन्सीवर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, एजन्सीच्या शटरवर 'गॅस सिलिंडर शिल्लक नाही' असा फलक लावण्यात आल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला. लांबून आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

या गोंधळानंतर व्यवस्थापक यांनी ग्राहकांशी संवाद साधला. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे गेल्या ४५ दिवसांपासून गॅस वितरणावर परिणाम झाल्याचा दावा व्यवस्थापनाने केला. 'स्टॉक उपलब्ध होताच नोंदणी केलेल्यांना उद्या पुरवठा केला जाईल,' असे आश्वासन त्यांनी दिले. तरीही ग्राहक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे तणाव वाढला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande