छ.संभाजीनगर जि. प.ची १५ एप्रिलला सर्वसाधारण सभा
- विषय समित्यांसाठी ८३ जागांवर राजकीय चुरस छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, १५ एप्रिलला विशेष सर्वसाधारण सभेत या निवडीवर होणार आहे. जि. प.
छ.संभाजीनगर जि. प.ची १५ एप्रिलला सर्वसाधारण सभा


- विषय समित्यांसाठी ८३ जागांवर राजकीय चुरस

छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत

विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, १५ एप्रिलला विशेष सर्वसाधारण सभेत या निवडीवर होणार आहे.

जि. प. ची निवडणूक ५ फेब्रुवारीला झाली व ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. त्यानंतर १८ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली व २ एप्रिलला विषय समित्यांचे सभापती निवडले गेले. जि. प. अधिनियमानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष

निवडल्यानंतर महिनाभराच्या आत सर्वसाधारण सभा घेऊन त्यात विषय समित्यांचे सदस्य निवडले जाणे अपेक्षित असते. जिल्हा परिषदेत यंदा ६३ सदस्य निवडून आले आहेत. स्थायी समितीचे सभापती हे अध्यक्ष असतात, सचिव हे मुख्यकार्यकारी अधिकारी असतात, तर पंचायत समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात. यात ८ जि. प. सदस्यांची निवड केली जाणार आहे. जलव्यवस्थापन समितीसाठी ६, कृषी समितीसाठी १०, समाजकल्याण ११, शिक्षण ८, बांधकाम ८, अर्थ ८, आरोग्य ८, पशुसंवर्धन ८ आणि महिला व बालकल्याण समितीसाठी ८ अशा दहा समित्यांसाठी ८३ सदस्य निवडले जातील.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande