
चंद्रपूर, 09 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार होऊ नये, ग्राहकांना नियमितपणे सिलिंडरचे वाटप व्हावे, याकरीता अधिका-यांनी नियमितपणे गॅस एजन्सी आणि सिलिंडरच्या गोदामला भेटी देऊन तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. तपासणी दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, अन्न धान्य वितरण अधिकारी सुमेध चवरे, खरेदी अधिकारी राहुल वानखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी चेतक गॅस एजन्सीचे मालक अनंत लहामगे यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले की, युध्दाच्या काळात नागरिकांमध्ये अफवा पसरल्याने एकाच वेळी ग्राहकांनी बुकींग केली. त्यामुळे सुरवातीला पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली. मात्र आता हळूहळू परिस्थतीत सुधारणा होत असून आमच्या एजन्सीमधून दररोज ३५० ते ४०० सिलिंडर वाटप केले जातात. पेट्रोलियम कंपन्यांकडूनही आता नियमितपणे सिलिंडरचा पुरवठा होत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व रेकॉर्ड दैनंदिन नोंदविण्यात येतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव