
अकोला, 09 एप्रिल (हिं.स.) छ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे भव्य आयोजन 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी मंडळ, लक्षेश्वर संस्थान येथे होणार आहे.
या शिबिराचे उद्देश नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडवणे आणि त्यांना विविध योजना व सेवा उपलब्ध करून देणे आहे. प्रलंबित तक्रारींचे निराकरण याद्वारे करण्याचे कामही शिबिरात पार पडेल.
शिबिरात अनेक मान्यवर सहभागी होणार असून सर्व संबंधित यंत्रणांचा सहभाग असेल. नागरिकांच्या महाराजस्व संबंधी समस्या तात्काळ सोडवल्या जातील, असे शिबिराचे आयोजनकर्ते सांगत आहेत.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी नागरिकांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे