लातूरमध्ये युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची सुवर्णसंधी
लातूर, 09 एप्रिल (हिं.स.) : केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील पात्र उमेद
नोकरी


लातूर, 09 एप्रिल (हिं.स.) : केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना रिलायन्स इंडस्ट्रीज, एच.डी.एफ.सी. बँक आणि गेल (इंडिया) लिमिटेड यांसारख्या देशातील 2000 आघाडीच्या कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांची इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

इंटर्नशिपदरम्यान उमेदवारांना प्रतिमहा 9,000 रुपये स्टायपेंड दिला जाईल, जो थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. या योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर बेरोजगार युवक पात्र आहेत.

यावेळी प्रशिक्षणार्थींना केवळ मानधन नव्हे, तर 6,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान आणि ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ तसेच ‘सुरक्षा विमा योजना’ अंतर्गत विमा संरक्षणही दिले जाणार आहे.

सध्या या योजनेचा तिसरा टप्पा सुरू असून इच्छुकांनी तात्काळ https://pminternship.mca.gov.in

या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे.

युवकांनी आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करण्यासाठी मदतीसाठी दत्तात्रय कांबळे (9028238465) किंवा लहू भंडारे (8055992900) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande