चंद्रपूर : नागरी सहकारी पतसंस्था नोंदणीबाबत 13 एप्रिल पर्यंत हरकती आमंत्रित
चंद्रपूर, 09 एप्रिल (हिं.स.)। श्री साईकृपा नागरी सहकारी पत संस्था, मर्या. राजूरा या संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था, राजुरा या कार्यालयास प्राप्त झाला आहे. संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयास 13 एप्रिल प
चंद्रपूर : नागरी सहकारी पतसंस्था नोंदणीबाबत 13 एप्रिल पर्यंत हरकती आमंत्रित


चंद्रपूर, 09 एप्रिल (हिं.स.)। श्री साईकृपा नागरी सहकारी पत संस्था, मर्या. राजूरा या संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था, राजुरा या कार्यालयास प्राप्त झाला आहे. संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयास 13 एप्रिल पुर्वी सादर कराव्यात, किंवा 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेल्या सुनावणीचे वेळी सदर हरकती दाखल कराव्यात असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कार्यालयात हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधितांना काहिही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी, असे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, आर.डी. कुमरे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande