
चंद्रपूर, 09 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून ८ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या १० लक्ष ६९ हजार ७४६ लिटर पेट्रोल पैकी १ लक्ष ९० हजार ३९२ लिटर पेट्रोलची विक्री होऊन ८ लक्ष ७९ हजार ३५४ लिटर पेट्रोलचा शिल्लक साठा, डिझेलचा एकूण साठा १३ लक्ष ६ हजार ८८० असून यापैकी ४ लक्ष ६० हजार १७६ लिटर डिझेलची विक्री होऊन ८ लक्ष ४६ हजार ७०४ लिटर डिझेलचा शिल्लक साठा तर ८ एप्रिल रोजी घरगुती सिलिंडरचा एकूण साठा १५ हजार २०८, यापैकी विक्री ६ हजार ४५८ आणि शिल्लक सिलिंडरचा साठा ८ हजार ७५० आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव