
नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांना निलंबित करण्यात आले. त्यांचे मुख्यालय परभणी येथील जिल्हा रुग्णालय हे असणार असल्याचे आदेश लातूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ रेखा गायकवाड यांनी काढले आहेत. दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराचा फटका डॉ संगिता देशमुख यांना बसला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष गोपाळराव सुर्यवंशी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांची बदली लातूर येथे झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी डॉ संगिता देशमुख या एक वर्षापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार घेतात नियमबाह्रा कामे करण्याचा सपाटा लावला होता. तसेच कार्यालयीन कामकाज करतांना आर्थिक देवाणघेवाण या कारणावरुन त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात वादाचे खटके उडत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाज ढेपाळले होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस पाठवून कामात सुत्रता आणावी अशी स्पष्ट सुचना दिली होती. त्यांच्या काळात झालेल्या नियमबाह्य बदल्या, तसेच पदोन्नती, समायोजन यामध्ये नियमबाहा कामे करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी वारंवार कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्या कामात सुधारणा होत नव्हती. नांदेड जिल्हा परिषदेस औषधी खरेदी करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला होता. निलंबनाची कारवाई करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला होता.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis