
नांदेड, 09 एप्रिल, (हिं.स.)। मराठा सेवा संघ नांदेड आयोजित शिवकुटुंब मेळावा हाँटेल ताज पाटील येथे पार पडला. या शिवकुटुंब मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. पंजाबराव चव्हाण उद्घाटक मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजीराव पवार प्रमुख मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे महासचिव इंजि. चंद्रशेखर शिखरे इंजि. शिवाजीराजे पाटील प्रमुख पाहुणे प्रा. अर्जुनराव तनपुरे, डॉ सोपानराव क्षिरसागर, इंजि.व्हि टी शिंदे, इंजि शेरा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अँड. सतीशकुमार जाधव यांनी केले.
माणसातील संवाद लुप्त होत चालला आहे. माणूस माणसाशी जोडला जावा समाजाचा निरंतर विकास व्हावा या उद्देशाने मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी कुटुंबांना एकत्रित आणण्यासाठी ही संकल्पना मांडली त्या दिशेने प्रयत्न देश व राज्य पातळीवर असे मिळावे होणे गरजेचे आहे. असे मत आपल्या प्रास्ताविकतेतून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सतिशकुमार जाधव यांनी व्यक्त केले. तर स्वागतपर मनोगत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पंडितराव कदम यांनी केले स्त्रियांची भूमिका, पुरुषा आणि स्त्री यातील दुराव्याचे, कलहाचे, स्त्रियांच्या कुचंबनेचे फलित म्हणजे अशी प्रकरणे आहेत अशी स्पष्ट शब्दात मांडणी केली. त्याचबरोबर सहभागी कुटुंबीयांसोबत संवाद साधला.
समारोपीय सत्रात इंजि. शिवाजीराजे पाटील यांनी स्वतःवर प्रेम करण्याचा सल्ला व आरोग्य विषयक सल्ला देऊन एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा आपण एकमेकांशी बोललो तर गैरसमजामुळे मुळे होणारे अंसख्य प्रश्न सहजपणे सुटू शकतात असे सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis