नांदेड - कर्णा येथे पतीनेच पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून
नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील कर्णा गावात पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याचा आरोप असून संशयाचीधक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मौजे कर्णा (ता. मुखेड) येथील महिलेचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याची माहिती मिळताच मुखेड
नांदेड - कर्णा येथे पतीनेच पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून


नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)।

मुखेड तालुक्यातील कर्णा गावात पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याचा आरोप असून संशयाचीधक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मौजे कर्णा (ता. मुखेड) येथील महिलेचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याची माहिती मिळताच मुखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे पाठवून पोस्टमार्टम करण्यात आले. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती हा वारंवार दारूच्या नशेत पत्नीशी भांडणे करत असे. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने साडीने गळा आवळून पत्नीचा खून केला. या तक्रारीवरून आरोपीयाच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 77/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (नांदेड), अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकत गोसावी (देगलूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande