नारळी सप्ताह - श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा सोहळा!- मुख्यमंत्री
बीड, 09 एप्रिल (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेला, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ''94व्या नारळी सप्ताह'' येथे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, श्री क्षेत्र गहिनी
अ


अ


बीड, 09 एप्रिल (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेला, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या '94व्या नारळी सप्ताह' येथे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेल्या, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या '94व्या नारळी सप्ताह' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाविकांना संबोधित केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी येथे मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर श्री संत गहिनीनाथ महाराज यांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे.

श्री संत वामनभाऊ महाराज यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. तसेच नाथ संप्रदायात गहिनीनाथांचे महात्म्य मोठे असून, या गडावर प्रत्येक काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. विशेष म्हणजे, या नारळी सप्ताहाचे नियोजन 2039 पर्यंत निश्चित झाले आहे, यातच या भक्तीकार्याचे यश दिसते. समाजाला एकत्र आणण्याचे हे काम अतिशय मोलाचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande