
परभणी, 09 एप्रिल (हिं.स.) : आयुर्वेद क्षेत्रातील कार्याला अधिक चालना देण्यासाठी आयुर्वेद व्यासपीठ परभणीची सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत डॉ. विनोद पत्की यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीनुसार सचिवपदी वैद्य गुरुदत्त चौधरी, तर कोषाध्यक्षपदी डॉ. विवेक गुंडेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून डॉ. मनोज दीक्षित आणि डॉ. विद्या भालेराव यांची निवड झाली आहे. सहसचिवपदी डॉ. पूजा बाहेती, तर सहकोषाध्यक्षपदी डॉ. मुक्तेश्वर पारवे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय, मासिक चर्चासत्र प्रमुख म्हणून डॉ. स्वप्नजा कळमकर आणि सहप्रमुख म्हणून वैद्य एकनाथ चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाढदिवस प्रमुखपदी डॉ. अमोल दीक्षित, महिला वाढदिवस प्रमुख म्हणून डॉ. सारिका ब्रह्मपूरकर व डॉ. सुचिता चांडक यांची निवड झाली आहे.
सामाजिक उपक्रमांसाठी पुरुष प्रतिनिधी म्हणून कुणाल कौसडीकर व संतोष वाईकर, तर महिला प्रतिनिधी म्हणून अर्चना ढमढेरे व मेघना मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला संघटन समन्वयक म्हणून अश्विनी निरवळ व डॉ. स्मिता कुलकर्णी, तर पुरुष संघटन समन्वयक म्हणून डॉ. पद्माकर फुटाणे व डॉ. सुरेश शिवनीकर यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीचे आयुक्त डॉ. प्रताप काळे (संभाजीनगर), डॉ. कळमनुरीकर, डॉ. रवी भंडारी, डॉ. कलानी मॅडम, डॉ. सुरेश खापरे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis