नाशिकमध्ये विविध वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा
नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.) : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, लवकरच हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष संजय करंजकर आणि प्रमुख सचिव
Savannah's Wad.Mayin Award


Savannah's Wad.Mayin Award


Savannah's Wad.Mayin Award


Savannah's Wad.Mayin Award


Savannah's Wad.Mayin Award


Savannah's Wad.Mayin Award


Savannah's Wad.Mayin Award


Savannah's Wad.Mayin Award


Savannah's Wad.Mayin Award


नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.) : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, लवकरच हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष संजय करंजकर आणि प्रमुख सचिव सुरेश गायधनी यांनी दिली.

यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये नितीन कोतापल्ले यांच्या “गुरु एका योग्याचे तुरुंगातील स्वप्न” या कादंबरीला कै. धनंजय कुलकर्णी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच डॉ. प्रमोद चौधरी यांच्या “पेल तीरावरून... तर असं झालं” या ललित लेखनाला डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सामाजिक व वैचारिक लेखनासाठीचा मु. ब. यंदे पुरस्कार नारायण शिंदे यांना “खान्देशातील खादी चळवळ” या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मेघश्री दळवी यांच्या “पॉपअप आणि इतर विज्ञानकथा” या लघुकथा संग्रहास पु. ना. पंडित पुरस्कार मिळणार आहे.

कथा लेखनासाठीचा डॉ. अ. वा. वर्टी पुरस्कार स्मिता जोगळेकर यांच्या “पुन्हा पुन्हा” या पुस्तकास जाहीर झाला आहे. चरित्रात्मक कादंबरीसाठीचा कै. अशोक टिळक पुरस्कार शमा भाटे यांना “नृत्यमय जग : नर्तनाचा धर्म” या पुस्तकासाठी प्रदान केला जाणार आहे.

तसेच भास्कर पवार यांच्या “जागर” या पुस्तकास प्रवास व शैक्षणिक विषयातील ग. वि. अकोलकर पुरस्कार मिळाला आहे. अभिषेक धनगर यांच्या “फ्योदर मित्रायलोविचचे ‘चार मृत्यू आणि एक पुनरुअभिषेक’” या अनुवादित पुस्तकास स्वा. वि. दा. सावरकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

बाल वाङ्मयासाठीचा स्व. प्रा. संगीता मुठाळ पुरस्कार देवबा पाटील यांच्या “गर्वाचे घर खाली” या पुस्तकास प्रदान करण्यात येणार आहे.

सर्व पुरस्कार विजेत्यांना पाच हजार रुपयांचा धनादेश, शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार निवड समितीत प्रा. अनंत येवलेकर, वंदना अत्रे, प्रा. शिशिर शिंदेकर, डॉ. चंद्रकांत संकलेचा, प्रा. सुनील हिंगणे, डॉ. तुषार चांदवडकर आणि प्रा. विद्या सुर्वे-बोरसे यांनी सहभाग घेतला.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande