रोजगारक्षम अभ्यासक्रम योजनेसाठी युवकांनी नोंदणी करावी : कोल्हापूर सहायक आयुक्त
कोल्हापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। राज्यात मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून सुरु होत असून यासाठी युवकांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा कौशल्
रोजगारक्षम अभ्यासक्रम योजनेसाठी युवकांनी नोंदणी करावी : कोल्हापूर सहायक आयुक्त


कोल्हापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। राज्यात मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून सुरु होत असून यासाठी युवकांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे. काळानुसार बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता उद्योग क्षेत्रात आवश्यक कुशल मनुष्यबळाचा पुरवठा आणि युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने राज्यात मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम योजना राबवली जात आहे.

या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून सुरु होत असून १८ ते ४५ वयोगटातील युवक आणि युवती यांच्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालय येथे ॲग्रिकल्चरल, अॅपेरल, ऑटोमोटिव्ह, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोटिव्ह, प्लंबिंग, ब्युटी आणि वेलनेस, फूड प्रोसेसिंग, आयर्न अँड स्टील या सेक्टर मधील विविध कोर्सेसचे अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवक युवतींनी https:/msbsvet.edu.in/public/ITI Short Term Training या लिंकवर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजिकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सी बिल्डिंग शासकीय निवासस्थान, विचारेमाळ दूरध्वनी ०२३१-२५४५६७७ येथे संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande