
मुंबई, 09 एप्रिल (हिं.स.) - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत दिनांक १०/११.०४.२०२६ रोजी टिटवाळा व वासिंद स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हा ब्लॉक प्लॅटफॉर्म विस्तार कामांसाठी (१५ डब्यांच्या गाड्यांची सोय करण्यासाठी) आवश्यक असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी तसेच टिटवाळा आणि खडवली स्थानकांवरील नवीन पॉइंट्सवर ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) कार्यान्वित करण्यासाठी घेण्यात येत आहे.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.
ब्लॉकची माहिती खालीलप्रमाणे :
दिनांक: १०/११.०४.२०२६ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र)
कालावधी: ११.०४.२०२६ रोजी ०२.१० ते ०३.२५ वाजेपर्यंत
ब्लॉक विभाग: टिटवाळा (समाविष्ट) ते वासिंद (वगळून) अप व डाउन मार्गावर
ब्लॉकमुळे होणारे परिणाम पुढीलप्रमाणे:
११.०४.२०२६ रोजी ०२.२७ ते ०३.२५ या कालावधीत खालील गाड्या नियंत्रित करण्यात येतील:
12102 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस वासिंद येथे थांबविण्यात येईल.
18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आसनगाव येथे थांबविण्यात येईल.
12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आटगाव येथे थांबविण्यात येईल.
20104 भटनी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस खर्डी येथे थांबविण्यात येईल.
तसेच,
01026 बलिया – दादर एक्सप्रेस आणि 01139 नागपूर – मडगाव विशेष एक्सप्रेस या गाड्या भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित करण्यात येतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी