पुण्यात विशेष डिजिटल शेतीशाळा; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
पुणे, 09 एप्रिल (हिं.स.)हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे कोरडवाहू शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व प
पुण्यात विशेष डिजिटल शेतीशाळा; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन


पुणे, 09 एप्रिल (हिं.स.)हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे कोरडवाहू शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शेतीशाळांद्वारे पेरणीपूर्व तंत्रज्ञान, जैविक व नैसर्गिक निविष्ठा, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच भात शेतीतील सुधारित तंत्रज्ञान याबाबत तज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. या शेतीशाळेमध्ये कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे व प्रगतशील शेतकरी यांचा सहभाग राहणार आहे.

पहिल्या दोन शेतीशाळा १ व ८ एप्रिल रोजी ऑनलाइन उपलब्ध असून, तिसरी व चौथी शेतीशाळा अनुक्रमे १५ व २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पाणी फाउंडेशन आणि उमेदच्या यु-ट्युब चॅनेलवर केल्या जाणार आहेत.

या कार्यशाळेस शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी मंडळे तसेच इच्छुक नागरिकांनी या डिजिटल शेतीशाळांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande