सतत कार्यमग्नता हा युरोपियन माणसाकडून शिकण्यासारखा गुण : अजित रानडे
वसंत व्याख्यानमालेत उलगडले नव्या करारानंतरच्या युरोपचे अंतरंग नाशिक, 16 मे (हिं.स.)। : भारत आणि युरोपीय देशांचे संबंध हे साधारण दोन हजार वर्षांपासून आहेत. आजमितीस आपण सर्व्हिस ओरिएंटेड इकॉनॉमी असून, आपल्याला युरोपकडून प्रॉडक्शन ओरिएंटेड इकॉनॉमी
Constant-work-engagement


वसंत व्याख्यानमालेत उलगडले नव्या करारानंतरच्या युरोपचे अंतरंग

नाशिक, 16 मे (हिं.स.)।

: भारत आणि युरोपीय देशांचे संबंध हे साधारण दोन हजार वर्षांपासून आहेत. आजमितीस आपण सर्व्हिस ओरिएंटेड इकॉनॉमी असून, आपल्याला युरोपकडून प्रॉडक्शन ओरिएंटेड इकॉनॉमी बनणे शिकण्याची संधी आहे. कारण सतत कार्यमग्न राहणे हा त्यांचा शिकण्यासारखा गुण आहे. असे प्रतिपादन जर्मनी येथील स्वतंत्र व्यावसाईक, व्यवसाय सल्लागार आणि सामाजिक उद्योजक अजित रानडे यांनी येथे केले.

नाशिकची गौरवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत 103 व्या वर्षातील 16 वे पुष्प श्री. रानडे यांनी गुंफले. त्यावेळी स्व. वसंतराव नेवासकर स्मृती व्याखानात ते 'नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातील तरुण व उद्योजकांसाठी युरोपातील संधी' या विषयावर बोलत होते. अरुण नेवासकर, नामको बँकेचे तज्ञ संचालक अँड. जयंत जायभावे, जर्मन गुरुकुलचे विनायक चंद्रात्रे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. नेवासकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

व्याख्यान मालेदरम्यान भरविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनात आज नाशिकच्या कलानिकेतन महाविद्यालयाच्या जयेश देसले आणि पंकज बकुरे या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकृती मांडल्या होत्या. पाहुण्यांसह रसिक नाशिककरांनी या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. श्री. रानडे म्हणाले की, जर्मनीसारख्या युरोपीय देशांबाबत आपल्याकडील सर्वांनाच उत्स्तूकता असते. त्याचवेळी युरोपमध्ये जाणाऱ्या मराठी माणसांची परंपराही तशीच मोठी आहे. साधारण शंभर- सव्वाशे वर्षांपासून मराठी माणसं जर्मनीत जात-येत असल्याचे सांगून त्यांनी या संदर्भात चित्र व ध्वनीफितीद्वारे अनेक दाखले दिलेत. त्याचवेळी मराठी शाळांच्या दूर्दशेबाबत बोलताना आम्ही जर्मनीत 13 मराठी शाळा सुरू केल्याचे नमुद केले. युरोप आणि भारताचा संबध दोन हजार वर्षांपासून आहे. व्यापार आणि राजकीय मुद्यांच्या अनुषंगाने हे संबंध असल्याचे सांगत त्यांनी हा संपुर्ण ईतिहास थोडक्यात मांडला. युरोपीय देशांची कार्यशैली, सील्क रूट, तेथील संस्कृतीपासून तर वास्को द गामाच्या समुद्र सफारीचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे तेथील शिक्षण क्षेत्र, विद्यापीठे, तेथे चालणारी संशोधन आदींचा उहापोह करताना युरोपमध्ये गुणवंत मराठी तरुणांसाठी मोठी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. जर्मनीची इकॉनॉमी 23 ट्रिलियन असल्याचे सांगून त्यांनी तेथील औद्योगिक विकासाचाही आढावा घेतला. यामध्ये अगदी छोट्या- छोट्या उद्योगांचे मोठे योगदान आहे. युरोपमधील बहुतांश भारतीय हे जर्मनीत राहतात. शिवाय तेथील मराठी टक्का वाढतोय. त्यांनी आपल्याकडील चांगल्या गोष्टी तिकडे सांगितल्या पाहिजे. विश्वास जिंकुन व्यापार वाढवला पाहिजे. यासाठीही आम्ही सतत प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे येत्या जूनमध्ये आम्ही इंडिया- युरोप बिझिनेस डे हा एक मोठा इव्हेंट आयोजित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी भारत आणि युरोप यांच्यातील मुक्त व्यापार करार आणि त्या अनुषंगाने बदललेल्या परिस्थितीचाही आढावा घेतला. सामान्य लोकांसाठी हा करार निश्चितच महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

-

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande