डोंगरेवाडी येथे ‘समृद्ध शेतकरी समृद्ध भारत अभियान 3.0’ अंतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात
लातूर, 20 मे (हिं.स.) : शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञान व शासन योजनांची सविस्तर माहिती मिळावी या उद्देशाने देवणी तालुक्यातील मौजे डोंगरेवाडी येथे ‘समृद्ध शेतकरी समृद्ध भारत अभियान 3.0’ अंतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात कृष
समृद्ध शेतकरी अभियान


लातूर, 20 मे (हिं.स.) : शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञान व शासन योजनांची सविस्तर माहिती मिळावी या उद्देशाने देवणी तालुक्यातील मौजे डोंगरेवाडी येथे ‘समृद्ध शेतकरी समृद्ध भारत अभियान 3.0’ अंतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.

या शिबिरात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत सोयाबीन व तूर पिकांच्या सुधारित लागवड पद्धती, फळबाग लागवड तसेच ‘जलतारा’ प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना उत्पादन वाढ व शाश्वत शेतीसाठी उपयुक्त दिशा देण्यात आली.

या प्रसंगी अश्विनीताई हंचनाळे, माजी उपसरपंच चंद्रकांतजी डोंगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षीताई डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी सोनटक्केजी, सहाय्यक कृषी अधिकारी पी. बी. कारभारी, सुनीलजी हंचनाळे, संजयजी डोंगरे, भरतजी गिरी, शाहूराजजी डोंगरे, सुभाषजी डोंगरे, शामजी गगनबोने, अमरजी तंबाके यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande