लातूर येथे शुक्रवारी होणारे दिव्यांग तपासणी शिबिर स्थगित
क्लाऊड सर्व्हर अपग्रेडेशनमुळे ‘यूडीआयडी’ पोर्टल 21 ते 24 मे बंद लातूर, 20 मे (हिं.स.) : एनएसजी क्लाऊड सर्व्हर अपग्रेडेशनच्या कामामुळे युआयडी पोर्टलवरील तांत्रिक सेवा 21 ते 24 मे 2026 या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. या तांत्रिक का
शिबिर स्थगित


क्लाऊड सर्व्हर अपग्रेडेशनमुळे ‘यूडीआयडी’ पोर्टल 21 ते 24 मे बंद

लातूर, 20 मे (हिं.स.) : एनएसजी क्लाऊड सर्व्हर अपग्रेडेशनच्या कामामुळे युआयडी पोर्टलवरील तांत्रिक सेवा 21 ते 24 मे 2026 या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे.

या तांत्रिक कारणास्तव 22 मे 2026 रोजी लातूर शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेले तपासणी शिबिर स्थगित करण्यात आले आहे. पोर्टल बंद असल्याने त्या दिवशी शिबिरासाठी उपस्थित राहू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दिव्यांग बांधवांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande