स्व. विलासराव देशमुख ग्रामीण टी-10 क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
लातूर, 20 मे (हिं.स.) : ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-10 क्रिकेट स्पर्धे’चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या स्पर्ध
क्रिकेट स्पर्धा


लातूर, 20 मे (हिं.स.) : ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-10 क्रिकेट स्पर्धे’चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या स्पर्धेचे उद्घाटन खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील युवकांमधील क्रीडा प्रतिभेला वाव देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या स्पर्धेची संकल्पना धिरज विलासराव देशमुख यांची आहे.

उद्घाटन समारंभास पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंखे, मांजरा कारखाना व्हा. चेअरमन अशोकराव काळे, 21 शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, शहर अध्यक्ष किरण जाधव, रेणा कारखाना चेअरमन अनंतराव देशमुख, रेणापूर बाजार समिती सभापती उमाकांत खलंग्रे, पंचायत समिती उपसभापती महेश चव्हाण, सुहास कदम, दत्तात्रय शिंदे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश देशमुख, जिल्हा बँक संचालक अनिताताई केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी मिळत असल्याचे सांगितले. अशा स्पर्धांमधून अनेक गुणवंत खेळाडू मोठ्या स्तरावर झळकू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande