
लातूर, 16 मे (हिं.स.) - श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औसा या संस्थेच्या चेअरमन पदाची निवड संस्थेचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष श्रीशैल उटगे व प्रशासकीय अधिकारी व्ही. एम. बोरफळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी जयश्रीताई उटगे यांची संस्थेच्या चेअरमनपदी सवार्नुमते निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी माजी चेअरमन विजयकुमार बोरफळे यांनी तसेच संस्थापक अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी सर्व संचालक मंडळाच्या वतीने नवनियुक्त चेअरमन जयश्री उटगे यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मागील कार्यकाळात माजी चेअरमन व संचालक मंडळाने संस्थेचे कामकाज अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध व ग्राहकाभिमुख पद्धतीने यशस्वीरीत्या चालविल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. तसेच संस्थेची विश्वासार्हता, आर्थिक प्रगती व सभासदांचा वाढता प्रतिसाद यामध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
नवनियुक्त चेअरमन माननीय जयश्रीताई उटगे यांनी आपल्या मनोगतात संस्थेची परंपरा, विश्वास आणि ग्राहकसेवा अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. सभासद, ग्राहक व सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा, पारदर्शक व्यवहार व तत्पर सेवा देण्यासाठी आगामी काळात अधिक सुधारणा करून संस्था प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नवीन नेतृत्वाखाली श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औसा ही संस्था आणखी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
या प्रसंगी मुजावर नजीर महमदसाब, शेख सन्नाउल्ला इसुलाल, श्रीमती दुरुगकर कल्पना राजेंद्र उटगे, सत्यम श्रीशैल्य, महामुनी गोविंद चंद्रकांत, सनाऊल्ला दारुवाले, कांबळे पवन अंगद, डामगिरे गणपत, शिवराज जमादार, बजरंग शितलसिंग सर्व संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis