उर्जा राज्यमंत्र्यांद्वारे अघोषित लोडशेडींगबद्दल गांभीर्याने दखल : अभियंत्यांकडून मागवला तात्काळ खूलासा : सुरळीत वीज पुरवठ्याचा आदेश
परभणी, 16 मे (हिं.स.)। महानगरपालिका हद्दीतील मध्यवस्तीसह चोहोबाजूंच्या वसाहतीत कमी-अधिक दाबाने होणार्या वीज पुरवठ्यासह अघोषित लोडशेडींगबद्दल दैनिक दिलासाने शनिवारी सायंकाळी ऑनलाईनद्वारे व्हायरल केलेल्या बातमीची या जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्
उर्जा राज्यमंत्र्यांद्वारे अघोषित लोडशेडींगबद्दल गांभीर्याने दखल : अभियंत्यांकडून मागवला तात्काळ खूलासा : सुरळीत वीज पुरवठ्याचा आदेश


परभणी, 16 मे (हिं.स.)।

महानगरपालिका हद्दीतील मध्यवस्तीसह चोहोबाजूंच्या वसाहतीत कमी-अधिक दाबाने होणार्या वीज पुरवठ्यासह अघोषित लोडशेडींगबद्दल दैनिक दिलासाने शनिवारी सायंकाळी ऑनलाईनद्वारे व्हायरल केलेल्या बातमीची या जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उर्जा राज्य मंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी तात्काळ दखल घेतली अन् कार्यकारी अभियंत्यांसह अन्य अधिकार्यांकडून या संबंधी खूलासा मागविला. अन् अंतर्गत छोट छोटे प्रश्न तात्काळ दूर करीत शहरवासीयांना सुरळीत असा वीज पुरवठा द्यावा, असा आदेश दिला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महानगरात मान्सूनपूर्व कामे सुरु आहेत. त्यामुळे त्या त्या क्षेत्रात वीज पुरवठा कामानिमित्त बंद ठेवावा लागतो आहे, असे अभियंत्यांनी नमूद केले. परंतु, त्या कामा व्यतिरिक्तसुध्दा कमी-अधिक दाबाने होणार्या वीज पुरवठ्याबद्दल तात्काळ चौकशी केली अन् हे प्रकार होत आहेत. परंतु, ते होता कामा नये, याची खबरदारी घेतली जाईल, असे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी नमूद केले. लोडशेडींग मूळीच नाही, असे स्पष्ट करतेवेळी काही किरकोळ कारणांमुळे खंडीत होणार्या वीज पुरवठ्याबद्दल तात्काळ सुधारणा करण्याचेही आश्वासित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande