
लातूर, 16 मे (हिं.स.)।निटूर येथे खताने भरलेला एक ट्रक मागे घेतानाचालकाच्या निष्काळजीपणामुळे पाठीमागे थांबलेले नागनाथ पांडुरंग मदाळे (५०, रा. निटूर) हे ट्रकच्या चाकाखाली चिरडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना निटूर येथे घडली.
पोलिसांनी सांगितले, लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील निटूर येथे केए ३२ - सी ८१३० क्रमांकाचा ट्रक खताने भरलेला होता. ट्रकचालकाने पाठीमागचा अंदाज न घेता ट्रक अचानक रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली. तेव्हा ट्रकच्या पाठीमागील बाजूस असलेले नागनाथ मदाळे हे चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.नागनाथ मदाळे यांचे शवविच्छेदन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. या प्रकरणी मयताचे भाऊ रघुनाथ मदाळे यांच्या तक्रारीवरून निटूर पोलिस चौकीत संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis