खालापूरमध्ये अल्पवयीन बालिकेवर अत्याचार, गुन्हा दाखल
रायगड, 20 मे (हिं.स.)। : अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला सात महिन्यांची गरोदर ठेवल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी एका आरोपीसह चौघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलीचे नंतर रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावून देण्यात आल्याचा धक्कादा
posko


रायगड, 20 मे (हिं.स.)। : अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला सात महिन्यांची गरोदर ठेवल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी एका आरोपीसह चौघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलीचे नंतर रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे २०२५ ते १८ मे २०२६ या कालावधीत आरोपी क्रमांक १ याने फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या अत्याचारातून पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर आरोपी क्रमांक २ ते ४ यांनीही पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही संगनमत करून मार्च २०२६ मध्ये त्याचे रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावुन दिले व त्यानंतर फिर्यादी हिने मुलास जन्म दिले. याबाबत खालापूर पोलीस ठाणे गुरनं.199/2026, बाल लै.अत्या.संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 चे कलम 4,6, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2),(आय),64 (2)(एम) 3(5)सह बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006चे कलम 6,11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई/विशाल पवार हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande