
रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर धामणी (ता. संगमेश्वर) येथील लक्ष्मी हॉटेल समोर रिक्षा व कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय काशिराम पवार (वय २५, रा. रांगव-चिखली, सनगरवाडी, ता. संगमेश्वर) आपल्या रिक्षामधून जात असताना भरधाव किया सेल्टोस मोटारीने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात धामणी येथील लक्ष्मी हॉटेलसमोर मुंबई-गोवा महामार्गावर घडला.
या अपघातात अजय पवार किरकोळ जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी मोटार अपघाताची नोंद केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी