
रायगड, 16 मे (हिं.स.)। नेरळ बाजारपेठ परिसरातून चोरीस गेलेली स्कुटी पोलिसांनी शोधून काढत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची सुझुकी कंपनीची एक्सेस 125 मॉडेलची एमएच 46 सीक्यू 7406 क्रमांकाची स्कुटी नेरळ बाजारपेठेतील अमन मटन शॉपसमोर पार्क करून ठेवली होती. दिनांक 11 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजेपासून ते 14 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने सदर दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 100/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपासादरम्यान आरोपीचा शोध घेण्यात आला असून दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री 8.50 वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. मा. न्यालायनेे ३ दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)