मुरुड येथे अप्पर तहसील कार्यालय येत्या महिन्याभरात सुरू होणार - आ. रमेशआप्पा कराड
लातूर, 16 मे, (हिं.स.) - मागील काही वर्षांपूर्वीच मोठी बाजारपेठ असलेल्या मुरुड येथे नगर परिषद आणि तहसील कार्यालय सुरू व्हायला हवे होते, मात्र झाले नाही यासाठी आमचे प्रयत्न आहेत, शासन स्तरावरील पूर्तता पूर्ण झाल्याने येत्या महिन्याभरात मुरुड येथे अप
रमेश आप्पा कराड


लातूर, 16 मे, (हिं.स.) - मागील काही वर्षांपूर्वीच मोठी बाजारपेठ असलेल्या मुरुड येथे नगर परिषद आणि तहसील कार्यालय सुरू व्हायला हवे होते, मात्र झाले नाही यासाठी आमचे प्रयत्न आहेत, शासन स्तरावरील पूर्तता पूर्ण झाल्याने येत्या महिन्याभरात मुरुड येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू होईल आणि नगरपरिषद निर्मितीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला इतर प्रक्रिया पूर्ण करून सहा महिन्यात नगरपरिषदेचा ही प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत लातूर तालुक्यातील मौजे मुरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराचे उद्घाटन लातूर ग्रामीणचे आमदार रमेश रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, अति. गटविकास अधिकारी सतिष चोरमले, भाजपा किसान मोचार्चे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोचार्चे भागवत सोट, संगायो समिती अध्यक्ष बन्सी भिसे, पंस सदस्या पंकज गायकवाड, सुचिता अंधारे, भाजपाचे मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, सुरज शिंदे, प्रताप पाटील, मुरुडचे उपसरपंच वैभव सापसोड, राजकिरण साठे, महेश कणसे, लताताई भोसले, जनाबाई साखरे, श्रुती सवयी, रवी माकोडे, किरण मुंडे, शुभम खोसे, तिलोतमा गाडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मुरुड महसूल मंडळातील नागरीक, महिला, पुरुष तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रात आणि राज्यात परिवर्तन झाल्यानंतर शासनाच्या वतीने गोरगरीब सर्वसामान्यांना केंद्रबिंदू म्हणून अनेक योजना सुरू केल्या. या सर्व विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभदेण्यासाठी, लाभार्थ्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन

करण्यात आले असल्याची माहिती देऊन यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, जनतेचे जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत हे शिबिर चालू राहणार आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी गोरगरीब सर्वसामान्यांची लहान मोठी प्रश्न या शिबिरातून सोडून घ्यावेत त्यांना दिलासा द्यावा लातूर ग्रामीण मतदार संघातील ठिकठिकाणीच्या समाधान शिबिरात शेकडो जणांच्या तक्रारी आणि प्रश्न सोडविण्याचे काम झाले असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

यावेळी समाधान शिबिरातून देण्यात येणाऱ्या सोयी, सुविधा आणि योजनांची माहिती उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे यांनी दिली. या शिबिरात लखपती दीदी प्रमाणपत्र, लेक लाडकी योजनेचा हप्ता वाटप, बेबी केअर किट, शेळी गट वाटप, मंडलातील गाव नकाशे वाटप, संगायो योजना मंजुरीपत्र, डिजिटल शिधापत्रिका, आयुष्यमान भारत कार्ड, रहिवासी आणि उत्पन्न प्रमाणपत्र, जिवंत सातबारा, स्वयंसहायता समूहांना बँकेमार्फत धनादेश वितरण, ट्रॅक्टर वाटप यासह विविध योजनेतील पात्र लाभाथ्यांना आ. कराड यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे व प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande