नांदेड : वसरणी येथील महाराजस्व शिबिरात १४७४ प्रमाणपत्रांचे वाटप
नांदेड, 17 मे (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात येत आहे, असे मत नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी व्यक्त
नांदेड : वसरणी येथील महाराजस्व शिबिरात १४७४ प्रमाणपत्रांचे वाटप


नांदेड, 17 मे (हिं.स.)।

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात येत आहे, असे मत नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी व्यक्त केले. वसरणी महसूल मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या शिबिरात ८७१ सातबारा, ५९१ आठ अ चे उतारे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे बारा लाभार्थी असे एकूण 1475 तर इतर विभागाकडून अनेक लाभार्थ्यांना लाभाचे कार्ड वितरित करण्यात आले.

डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की, महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नांदेड तालुक्यात जवळपास १० हजार लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात प्रशासन यशस्वी होत आहे

, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी तहसीलदार संजय वारकड नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड, स्वपनील दिघलवार, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, वैदयकिय अधिकारी तुप्पा गुडपे, मंडळ कृषी अधिकारी सुनील सानप, धनेगावचे सरपंच पिंटू पाटील शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावं, हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले तसेच आतापर्यंत २२ हजार लोकांना विविध प्रमाणपत्र दिली असल्याचे ते म्हणाले. त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने महसूल विभाग, निवडणुक विभाग, विशेष सहाय्य विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग, महावितरण, आधार केंद्र, आपले सरकार केंद्र,

अनुलोम संस्था आदींचे स्टॉल लावण्यात आले होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande