
पक्षाचे सेक्रेटरी कॉ रमेश वाघमारे तरअध्यक्ष कॉ उत्तम कडू
सुरगाणा, 17 मे (हिं.स.)। - अखिल भारतीय किसान सभेच्या सुरगाणा तालुका कमिटीचे तालुका अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाची सुरवात ध्वजारोहणाने झाली त्यानंतर पक्षासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रदांजली वाहून क्रांतिकारी अभिवादन केले, अध्यक्षीय मंडळाची निवड करुन अधिवेशनाला सुरुवात झाली. गेल्या तिन वर्षाच्या कालावधीत पक्षाने केलेली कामे आणि जनहितार्थ संघर्ष याविषयींच्या अहवालाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विभागनिहाय चर्चा करुन अहवाल मंजूर करण्यात आला.
अधिवेशनासाठी उपस्थित उपस्थित असलेल्या सुरगाणा तालुक्यातील प्रतिनिधीमधून पुढील तीन वर्षासाठी सुरगाणा तालुका कमिटी नियुक्त केली. यात एकूण चौपन्न (54) सदस्यांची निवड करण्यात आली. यात माकपचे नवनियुक्त सेक्रेटरी कॉ रमेश वाघमारे, सह सेक्रेटरी कॉ भास्कर जाधव तर तालुका अध्यक्ष कॉ उत्तम कडू उपाध्यक्ष कॉ वसंत बागुल, कॉ अशोक धूम यांची एकमताने निवड करण्यात आली. उपस्थित प्रतिनिधी आणि नवनियुक्त सदस्यांना मार्गदर्शन करतांना माजी आमदार कॉ जे पी गावित यांनी सांगितले की, देशात जातीयवादी राजकारण सुरु आहे, जातीयवादी राजकारण्यांना देश स्वतःच्या ताब्यात ठेवायचे आहे, सोयीनुसार अंबानी अदानी यांना विकायचा आहे, त्यामुळे हळूहळू देशाची विक्री करुन देश भांडवलदारांकडे द्यायचा आणि त्याच भांडवलदरांचा वापर सत्ता हस्तगत करायचे हेच ठरवले आहे. भांडवलदरांचा वापर करुनच बीजेपी पक्षाने महाराष्ट्र पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा हया राज्यांची सत्ता मिळवली आहे.या सरकारला शिक्षणाचे खाजगीकरण करुन देशातील गोर गरीब जनतेच्या मुलांची शैक्षणिक नुकसान करायची आहे.गरीब जनतेला त्यांच्या मुलांना देशोधडीला लावले आहे. त्यामुळे देशाला भेडसावणाऱ्या हजारो प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाची किसान सभा संघटना मजबूत करावी लागेल. किसान सभेच्या कार्यकर्त्यांना सूचना आहे की आता सरकारने योजनांसाठी फार्मर आयडी काढायला सांगितले आहे, सरकारच्या योजणांसाठी मात्र त्यात जमिनीची अट आहे त्यामुळे वनपट्टा धारकांना सरकारचा फार्मर आयडी वनजमीन धारकांसाठी धोक्याचा ठरणार आहे. त्यामुळे लाल बावटा आणि किसानसभा वन धारकाला प्रथम हक्काची दहा एकर जमीन, स्वतंत्र सातबारा, शेतीसाठी पाणी आणि त्यानंन्तर इतर योजना घेण्याचे आवाहन करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV