छ. संभाजीनगरात संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या जप्त; 20.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
छत्रपती संभाजीनगर, 17 मे (हिं.स.)। कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 20 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
छ. संभाजीनगरात संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या जप्त; 20.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत


छत्रपती संभाजीनगर, 17 मे (हिं.स.)।

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 20 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार मसोड येथे उभ्या असलेल्या एका ट्रकची कृषी विभागाच्या पथकाने कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ‘आर्य केमिकल्स अँड मिनरल इंडस्ट्रीज, नागोर (राजस्थान)’ यांचे बिल असलेली संशयास्पद जिप्सम पावडर आढळून आली. सदर ट्रकमधून 40 किलो वजनाच्या एकूण 500 गोण्या जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद खताचे नमुने घेऊन ते शासकीय खत तपासणी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून प्राप्त निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

या कारवाईत जिपचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव, गुणवत्ता नियंत्रणचे कृषी अधिकारी लक्ष्मण काळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज राठोड, गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके व वसमत पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामेश्वर गवळी यांनी सहभाग घेतला.

पथकाने 500 बॅगा संशयास्पद जिप्सम पावडर तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंपनीचा ट्रक जप्त केला आहे.

या प्रकरणात श्री. राम रतन (रा. सियागाव का मोहल्ला, स्वरूपदेसार, जि. बिकानेर, राजस्थान) व इतर एक जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कळमनुरी गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके यांच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, विभागीय कृषी अधिकारी अशोक तिडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

********

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande