
लातूर, 17 मे (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आगाराची नागठाणा – अहमदपूर ही एसटी बस तांबट सांगवी परिसरात आज पलटी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सुमारे ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, बस पलटी झाल्यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांकडूनही मदतीचा हात दिला जात आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis