
लातूर, 17 मे (हिं.स.)।
मोबाईलच्या दुनियेत बालपण दंग सोशल मीडियाने नात्यात दुरावा आला सगे सोयरे भेटतात फक्त व्हाट्सअप. इंस्टाग्राम व फेसबुक वर.. झुक. झुक झुक झुक आगीनगाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मनात लहानपणी मौज मजा करण्यासाठी आई सोबत जाणारे चिमुकले आज मोबाईलच्या दुनियेत हरवून गेले आहेत.
मामाच्या गावाला जाऊया जाऊया... हे गाणे आजही कानावर पडले की बालपणीच्या आठवणी ताज्या होतात मात्र आता मामाच्या गावाला जाणारी बहीण आणि बच्चा ची पावले थंबकू लागली आहेत. एकेकाळी गावच्या शिवारात जोडणाऱ्या गावरान आंब्याच्या बागा आता नामशेष होऊ लागले असून त्याचा थेट परिणाम उन्हाळ्यातील कौटुंबिक भेटीगाठीवर आणि नातेसंबंधाच्या घोड्यावर होताना दिसत आहेत.
पाहुणचाराचा उत्साह ओसरला
पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी लागली की मामाच्या गावाला जाण्याची ओढ बहिणी व भाच्यांना असायची पण आता परिस्थिती बदलली आहे आंब्याचा तुटवडा नैसर्गिकरित्या पिकवलेले गावरान आंबे आता दुर्मिळ झाले आहेत बाजारात मिळणारी आंबे पूर्वीसारखी चव देत नाहीत नात्यांमधील दुरावा ज्या आंबा झाडांच्या निमित्ताने एकत्र येणे व्हायचे ते झाडेच कमी झाल्याने व नसल्यामुळे आता खास आमरसासाठी येण्याचे निमित्त कमी झाले आहे बदलती जीवनशैली मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटीसाठी चे महत्व कमी होत चालल्याची खंत ज्येष्ठा कडून व्यक्त होत आहे..
गावरान मेव्याची जागा सिमेंटच्या जंगलांनी घेतली
काही दशकापूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेताच्या बांधावर गावरान आंब्याची मोठी झाडे असायची. वैशाख वनव्यात या झाडांच्या सावलीत बसून आंब्याचा रस आणि पोळीचा आस्वाद घेणे हा एक मोठा सोहळा असायचा याच आमरसाच्या जेवणासाठी बहीनि आपल्या मुलांना घेऊन माहेरी येत असत मात्र आता वाढते शहरीकरण वृक्षतोड आणि शेतीतील बदलामुळे या गावरान फळ बागा कमी झाल्या आहेत.
निसर्ग जपला तरच नाती टिकतील !
ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक विन घट्ट करण्यात या आमरायांचा मोठा वाटा होता जर आपण पुन्हा एकदा झाडे लावून निसर्ग जपला नाही तर येणाऱ्या पिढीसाठी मामाचं गाव आणि गावरान आंबा केवळ पुस्तकातील गोष्टी बनवून राहतील उन्हाळ्याच्या सुट्टीत होणारी ती भाच्याची किलबिल आणि बहिणीच्या येण्याने घराला येणारे दर्पण आता कमी होत चालले अजून निसगार्चा हा हास सामाजिक नात्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis