नांदेड जिल्हा केमिस्ट निवडणूक : अध्यक्षपदासाठी तब्बल १३ दावेदार
नांदेड, 17 मे (हिं.स.)। नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत असून, संघटनेत सध्या शह-काटशहाचे राजकारण तापले आहे. तब्बल एका वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी १३ जणांनी उमे
नांदेड जिल्हा केमिस्ट निवडणूक : अध्यक्षपदासाठी तब्बल १३ दावेदार


नांदेड, 17 मे (हिं.स.)।

नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत असून, संघटनेत सध्या शह-काटशहाचे राजकारण तापले आहे. तब्बल एका वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी १३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बहुरंगी लढतीची चर्चा सुरू झाली आहे. सचिव, उपाध्यक्ष

आणि कार्यकारिणी सदस्य पदांसाठीही मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज भरले आहेत.

विविध गटांनी आपापले समर्थ उमेदवार मैदानात उतरवले असून, पॅनल बांधणी, मतांचे गणित आणि गटबाजीला वेग आला आहे. काही उमेदवार निवडणूक लढवण्यापेक्षा दबावतंत्र राजकारणासाठीच मैदानात उतरल्याची चर्चा संघटनेत रंगली आहे. कोण कोणत्या पॅनलमध्ये जाणार, कोण माघार घेणार आणि अंतिम लढत किती गटांमध्ये होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, मतदार यादीतील गोंधळामुळे

निवडणुकीभोवतीचा वाद आणखी चिघळला आहे. संघटनेचे माजी सचिव तथा ज्येष्ठ सदस्य रामदेव दाड यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा तांत्रिक दोष की जाणीवपूर्वक डाव, याबाबत संघटनेत चर्चा रंगली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता केवळ संघटनात्मक न राहता प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande