बालविवाहातून अत्याचार; किशोरी माता केल्याचा आरोप
रायगड, 17 मे (हिं.स.)। कोलाड पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असतानाही तिचा अज्ञानाचा फायदा घेत रितीरिवाजाप्
Child marriage: Allegations of child abuse and neglect


रायगड, 17 मे (हिं.स.)। कोलाड पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असतानाही तिचा अज्ञानाचा फायदा घेत रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला. त्यानंतर तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवून तिला गरोदर केले व किशोरी माता बनविल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी व आरोपी हे नात्याने पती-पत्नी म्हणून रोहा तालुक्यात राहत होते. मात्र फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्याशी विवाह केला आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी कोलाड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 61/2026 अन्वये बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 अंतर्गत कलम 6, 8, 12 तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम 9 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(i), 65(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई /भोजकर हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande