
कोल्हापूर, 17 मे (हिं.स.)। जिल्ह्यात पडणाऱ्या पर्जन्यमानामुळे पुरस्थिती निर्माण होते .या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनान पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड यांनी दिली. राजाराम बंधारा येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी साहित्य आणि प्रात्यक्षिकाची आज पाहणी केली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल,दुरुस्ती,प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या उद्देशाने तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सामील झालेल्या आपदा मित्र व आपदा सखींची आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रेस्क्यू बोट,लाइफ जॅकेट,लाइफ रिंग,सॉकर कटर,हायड्रोलिक कटर,रेस्क्यू रोप,इमर्जन्सी फ्लोटींग लाईट्स आदींची प्रत्यक्ष पाहणी राठोड यांनी यावेळी केली.
याप्रसंगी करवीर तहसीलदार स्वप्निल पवार अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह आपदा मित्र व सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar