
बीड, 17 मे (हिं.स.)। सध्या उन्हाचा चटका जोरात वाढला असून उकाड्यापासुन सुटका मिळवण्यासाठी थंड व शित पेया नागरीक पित आहेत. परंतू अशा गर्मित चहा पिणाऱ्यांची संख्या आहे. अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात कडक उन्हातही गुळाच्या चहाकडे नागरीकांचा कल मोठया प्रमाणात दिसत असून गुळाला मागणी वाढल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना मात्र अच्छे दिन आल्याचे पाहिला मिळत आहे.
शहरी, ग्रामीण भागात पुर्वी गूळ आरोग्यदायी व फायदेशीर असल्यामुळे साखरेपेक्षा अधिक गुळाचा वापर केला जायचा. कोणताही ऋतू असो गुळाच्या चहापासुन दिवसाची सुरूवात होत होती. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हातून घरी आल्यावर उन्हापासुन सुटका मिळवण्यासाठी गुळाचा खडा तोंडात ठेवला जायचा. तर अनेक वेळा गुळ आंब्याचे पन्न शितपेया प्रमाणे पिल्ले जायचे. सणसुध्दीत पुरणासाठी सर्रास वापर केला जायचा. गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. शारीरिक लवकर अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्यास फायदा होतो. गुळाच्या वापरामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी प्रमाणात आसतो. शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करत आसतो. गुळ आरोग्यदायी आसल्यामुळे गुळाचा वापर घरोघरी होत होता.
गुळापेक्षा साखरेला मागणी वाढल्यामुळे गूळ घराघरातून हद्दपार झाला. गुळाची जागा साखरेने घेतल्यामुळे गुळ दुर्मीळ झाला आहे. साखरेच्या अती वापरामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चहासह सर्वच गोड पदार्थ खाण्यावर निर्बंध आले आहेत. त्या मुळे गुळाची गोडी वाढली आहे. साखरेची जागा आत्ता पुर्वीप्रमाने गुळाने घेतली आहे. आत्ता सर्वाधीक आरोग्यदायी चहा म्हणून गुळच्या चहाला मागणी आहे. गुळाचा चहा पिणाऱ्याची संख्या शहरी ग्रामीण भागात वाढल्यामुळे साखरेचे महत्व हळूहळू कमी होऊन गुळाचं महत्त्वाचा वाटत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शित पेयाला मागणी जास्त आसते. तरीसुध्दा नागरीकांचा गुळाचा चहा पिण्याकडे सर्वाधीक कल दिसत आसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी गुळाच्या चहाचे मोठमोठे स्टॉल लागले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis