माजी आ. संगीता ठोंबरेंना लोकायुक्तांकडून क्लीन चिट
बीड, 17 मे (हिं.स.)। लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत दाखल प्रकरणी केलेले आरोप चुकीचे असल्याचे लोकायुक्तांनी सांगितल्यामुळे माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह सर्व संचालक मंड
माजी आ. संगीता ठोंबरेंना लोकायुक्तांकडून क्लीन चिट


बीड, 17 मे (हिं.स.)।

लोकनेते गोपीनाथराव

मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत दाखल प्रकरणी केलेले आरोप चुकीचे असल्याचे लोकायुक्तांनी सांगितल्यामुळे माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाला क्लीनचिट मिळाली आहे.

लोकायुक्तांकडे तक्रार केली होती की, सूतगिरणीने बनावट कागदपत्रे, बनावट ७/१२ उतारे आणि खोट्या बांधकाम परवानग्यांच्या आधारे शासनाची १४ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रक्रियेत समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा दावाही त्यांनी केला होता. लोकायुक्त (न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे) यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली त्यात त्यांनी तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगत सूतगिरणीच्या प्रशासन व

संचालक मंडळाला क्लीनचिट दिल्यामुळे माजी आमदार संगीता ठोंबरे, विजयप्रकाश ठोंबरे यांना दिलासा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande