कोल्हापूर सहकारी बोर्डाची दुरावस्था भरून काढू - आ. प्रवीण दरेकर
कोल्हापूर, 17 मे (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी आज सहकारी संघाच्या अखत्यारीत येणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाला भेट दिली व पाहणी केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाची दुरावस्था भरून काढू,
कोल्हापूर सहकारी बोर्ड


कोल्हापूर सहकारी बोर्ड


कोल्हापूर, 17 मे (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी आज सहकारी संघाच्या अखत्यारीत येणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाला भेट दिली व पाहणी केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाची दुरावस्था भरून काढू, असे आश्वासन आ. दरेकर यांनी संचालक मंडळाला दिले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक अशोक जगताप, संचालक धनंजय शेडगे यांसह कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक मंडळ आणि सहकारातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाला भेट दिली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संपूर्ण परिसराची, विद्यार्थी वसतिगृहांची व प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. याप्रसंगी आ. दरेकर यांचा बोर्डाच्या संचालक मंडळाकडून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी दरेकर यांनी येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सहकाराला शिक्षण-प्रशिक्षण देणारे दर्जेदार केंद्र बनवू, कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाची जी दुरावस्था झाली आहे ती भरून काढू, असे आश्वस्त केले. आ. दरेकर यांच्या पुढाकाराने कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाला नवसंजीवनी मिळणार असल्याने बोर्डाच्या सेवक वर्गातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande