आमदार प्रकाश सोळंके तालुक्यातील भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी लीन
बीड, 17 मे (हिं.स.)। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोंळके आज तालुक्यातील भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी लीन झाले. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भारतातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असून, ही बाब संपूर्ण मतदारसंघासाठी अभिमाना
अ


बीड, 17 मे (हिं.स.)।

माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोंळके आज तालुक्यातील

भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी लीन झाले.

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भारतातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असून, ही बाब संपूर्ण मतदारसंघासाठी अभिमानास्पद आहे. अधिकमासाच्या कालावधीत देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.

यासंदर्भात बोलताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की,

आज अधिकमासाच्या प्रारंभी भगवान पुरुषोत्तमाची विधिवत पूजा व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. या पवित्र पर्वाच्या निमित्ताने सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी लाभो, ही प्रार्थना.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande