रत्नागिरी : देवरूखमधून अल्पवयीन तरुणी बेपत्ता
रत्नागिरी, 17 मे (हिं.स.) । देवरूख येथील अनुष्का संतोष चव्हाण (वय १६) ही अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. १६ मे २०२६ रोजी सायंकाळी अनुष्का कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली. ती ओझरे रोडच्
रत्नागिरी : देवरूखमधून अल्पवयीन तरुणी बेपत्ता


रत्नागिरी, 17 मे (हिं.स.) । देवरूख येथील अनुष्का संतोष चव्हाण (वय १६) ही अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शुक्रवार, दि. १६ मे २०२६ रोजी सायंकाळी अनुष्का कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली. ती ओझरे रोडच्या दिशेने धावत गेल्याचे काही नागरिकांनी सांगितले. तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय आणि पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहेत.

ही तरुणी कोणाला आढळल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ ९४०३७१६४९३ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा देवरूख पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande