भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान
छत्रपती संभाजीनगर, 17 मे (हिं.स.)। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ''पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६'' अंतर्गत आयोजित भारतीय जनता पार्टी, जालना ग्रामीणच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अभ्यास वर्ग प्रशिक्षण शिबिरा
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 मे (हिं.स.)।

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत

'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६' अंतर्गत आयोजित भारतीय जनता पार्टी, जालना ग्रामीणच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अभ्यास वर्ग प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, राष्ट्रनिर्माणाचा विचार घेऊन चालणारे एक कुटुंब आहे. या शिबिराच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनात्मक कार्याला तळागाळापर्यंत अधिक बळकटी देण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी मिळून व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश कार्यकर्त्यांना पक्षाच्या मूळ विचारधारेची सखोल ओळख करून देणे, बूथ पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटन कौशल्य मजबूत करणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत शासनाच्या जनकल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी जनसंपर्काची निर्मिती करणे हा होता. यासोबतच, केवळ राजकारण न करता सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवणे आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक ती रणनीती आखून पूर्वतयारी करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

सक्षम, निष्ठावान आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांना संपूर्ण पक्षनिष्ठा, अविरत जनसेवा आणि संघटन विस्तारासाठी आगामी काळात अधिक जोमाने व आत्मविश्वासाने कार्य करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी रावसाहेब पाटील दानवे, जालना जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, सत्र अध्यक्ष साहेबराव मामा कानडजे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande