परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार - आ. डॉ. राहुल पाटील
परभणी, 17 मे (हिं.स.)। देशात वाढती महागाईने कहर केला असून शेती मालाला भाव नाहीत, शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक हे विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्
परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार - आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार


परभणी, 17 मे (हिं.स.)। देशात वाढती महागाईने कहर केला असून शेती मालाला भाव नाहीत, शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक हे विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस परभणीचे निष्ठावंत आमदार डॉ राहुल पाटील यांनी व्यक्त केला. तसेच परभणी जिल्हा भगवामय करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

परभणी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. त्यानिमित्ताने विटा ता. सोनपेठ येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा अधिक मासा निमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 17 रोजी पार पडला यावेळी आमदार डॉ पाटील बोलत होते.यावेळी पाथरी विधानसभा प्रमुख तथा जेष्ठ नेते कल्याणराव रेंगे, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, परभणी महा नगर प्रमुख डॉ विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पिंगळे, मुंजाभाऊ कोल्हे, तालुकाप्रमुख संतोष गवळी, हरिभाऊ वाकणकर, शहरप्रमुख अमोल दहीवाळ, शेतकरी संघटनेचे विश्वंभर गोरवे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गवळी यांनी केले तर कृष्णा पिंगळे, हरिभाऊ वाकणकर, रवींद्र धर्मे, कल्याणराव रेंगे आदींनी मनोगत व्यक्त केले.आमदार पाटील यांनी पुढे बोलतांना पुढील काळात परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत परभणी जिल्ह्यात पक्ष संघटना ही नव्या जोमाने उभी करून मजबूत करणार असल्याचे मत व्यक्त करत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामुळे सोनपेठ तालुक्यातील शिवसैनिकात नवीन उत्साह निर्माण झाला असून भविष्यात शिवसेनेची तालुक्यातील काम वाढणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपशहर प्रमुख जनार्दन झिरपे, श्रीकृष्ण साठे, बागुल शेख, कैलास गिराम, तुकाराम साठे, विशाल भोरे, भास्कर भोसले, जगन्नाथ कोलते यांच्यासहशिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच विटा येथील ग्रामस्थ, शिवसैनिक तसेच महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande