मानवी हक्क विषयावर चिकित्सक संशोधन, प्रा. गोणारकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान
नांदेड, 17 मे (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत सामाजिक प्र-शाळेत दिनांक पीएच.डी अंतिम वायवा यशस्वीरित्या पार पडला. यामध्ये संशोधक प्रा. पी. डी. गोणारकर यांनी परीक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत
मानवी हक्क विषयावर चिकित्सक संशोधन, प्रा. गोणारकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान


नांदेड, 17 मे (हिं.स.)।

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत

सामाजिक प्र-शाळेत दिनांक पीएच.डी अंतिम वायवा यशस्वीरित्या पार पडला. यामध्ये संशोधक प्रा. पी. डी. गोणारकर यांनी परीक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत आपले संशोधन प्रभावीपणे सादर केले.

या वायवासाठी चेअरमन म्हणून डॉ. शालिनी कदम यांनी काम पाहिले, तर बाह्य परीक्षक म्हणून डॉ. विजय तुंटे उपस्थित होते. प्रा. पी. डी. गोणारकर यांनी डॉ. कविता सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण केले.

यावेळी डॉ. मनोहर चासकर, डॉ. अशोक महाजन, डॉ. राहूल नरंगलकर, डॉ. मारोती गायकवाड, डॉ. संतोष शेंबाळे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण निदानकार, अविनाश पिंगळे, नरेंद्र रेड्डी तसेच प्रा. भास्कर पवार यांनी प्रा. पी. डी. गोणारकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रा. पी. डी. गोणारकर यांनी मानवी हक्क व मराठवाड्यातील

मातंग समाजाची परिस्थिती एक चिकित्सक अभ्यास या विषयावर सखोल व परिश्रमपूर्वक संशोधन केले असून, त्यांच्या या संशोधनामुळे राज्यशास्त्र विषयात मोलाची भर पडल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्र परिवार व विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande