संजय गांधी अभयारण्यातील माॅर्निंग वाॅकचा मार्ग खुला
ठाणे, 17 मे (हिं.स.)। ४ टिकुजींनीवाडी रोड, ठाण्यातील निसर्ग परिचय केंद्र परिसरातील भूखंडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच बिल्डरकडून बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामाच्या आडून संबधितांनी नागरिकांची वहिवाट अडविण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी, माॅ
ठाणे


ठाणे, 17 मे (हिं.स.)। ४ टिकुजींनीवाडी रोड, ठाण्यातील निसर्ग परिचय केंद्र परिसरातील भूखंडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच बिल्डरकडून बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामाच्या आडून संबधितांनी नागरिकांची वहिवाट अडविण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी, माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या नागरिकांची अडचण झाली होती. ही बाब समजताच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सकाळीच घटनास्थळ गाठून ही वहिवाट मोकळी करून दिली.

प्रभाग क्र. ४ मधील टिकूजीनीवाडी परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी वनविभागाच्या जागेबाबत वाद विवाद सुरु असून मुंबई उच्च न्यायालयाच्या फेब्रुवारी २०२६ च्या निकालानुसार दयाभाई अँड कंपनी तर्फे केलेल्या दाव्याला पाठबळ मिळाले होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात वनविभागाने सुप्रीम कोर्टात केलेल्या दाव्यामुळे २७ एप्रिल २०२६ रोजी सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. तरीही, या ठिकाणी पत्रे लावून नागरिकांचा माॅर्निंग वाॅकचा रस्ता अडविण्यात आला आहे. ही माहिती राष्ट्रवादी युवी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांना मिळताच त्यांनी मनोज प्रधान यांना याबाबत माहिती दिली. प्रधान यांनी तत्काळ सदर ठिकाणी जाऊन संबधितांशी बोलणे केले. जर रस्ता उघडला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला.

मनोज प्रधान यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबधितांनी ही वाट मोकळी करून दिली. सदर बिल्डरच्या म्हणण्यानुसार, बांधकाम करण्यास स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आपण न्यायलयाचे आदेश तपासून पुढील भूमिका घेऊ, असे प्रधान यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande