
नाशिक, 17 मे (हिं.स.)। आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक अध्यात्मिक गुरु परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा 70 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात नाशिक मध्ये साजरा करण्यात आला.
नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान येथे श्री श्री रविशंकर जी अर्थात गुरुदेव यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते, यामध्ये सत्तरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले, श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस साधकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गुरुदेवांच्या दीर्घायुष्यासाठी व त्यांच्या सेवा कार्यासाठी अधिक बळ मिळण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली, सर्व साधकांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख अतिथी ,पाहुणे, मान्यवर समस्त नाशिककर यांच्या उपस्थितीत सत्संग सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. याप्रसंगी जिल्हा शिवसेना अध्यक्ष मा अजय दादा बोरस्ते यांचे सह त्यांच्याच प्रभागातील नगरसेवक मा स्वातीताई भामरे कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या. बीजेपी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री लक्ष्मण सावजी व सिंहस्थ पालकमंत्री गिरीशजी महाजन यांचे स्वीय सचिव प्रकाश ननावरे हजर होते सदर कार्यक्रमासाठी उद्योजक प्रभू सर व उद्योजक जगदीश मिरचंदानीउद्योजक बात्राजी कुटुंब सह सहभागी झाले होते ,समस्त नाशिककर श्री श्री रविशंकर जी गुरुदेव यांचे सर्व फॉलोवर प्रशिक्षक संघटक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे नियोजनासाठी महाराष्ट्र अपेक्स बॉडी मेंबर डॉ उमेशजी मराठे, ॲड बिपिन जी शिंगाडा, स्टेट टीचर कॉर्डिनेटर व डिस्ट्रिक्ट टीचर कॉर्डिनेटर श्री भिवराजी घोडे ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम टीचर श्री खंडूजी गांगुर्डे श्री जनार्दन खळेकर, डॉ मनिषा मराठे ,ॲड. विशाल चव्हाण ,व्हिडिएस कॉर्डिनेटर प्रशांत चौधरी अशोक गवळी, वैशाली आहेर, प्रशांत जाधव ,झोडगे ताई, सुमन सिंग यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. श्री श्री संस्कार महाराष्ट्र राज्य कॉर्डिनेटर शोभना बागवे यांनी व सहयोगी श्री श्री संस्कार प्रशिक्षक यांच्या मदतीने 25 मुलांनी रामायणातील गीत गायन केले मुलांनीच सूत्रसंचालन करून बाल संस्कारासंबंधी प्रबोधन केले सत्संग कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV